॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Saturday, July 7, 2012

आतां अभिनव वाग्विलासिनी


आतां अभिनव वाग्विलासिनी| ते चातुर्यार्थकलाकामिनी|
ते शारदा विश्वमोहिनी| नमिली मियां ||१-२१||

... अर्थ:अपूर्व शब्द विलासाची जी परमेश्वर शक्ती, चातुर्यपूर्वक अर्थाची कला दाखविणारी, सर्व चौसष्ट कलेची श्रीमूर्ती व तशाच शब्द विलासामुळे जगाला मोह पडणारी अशी जी शारदा,तिला मी नमस्कार केला.||१-२१||

विवरण : शब्दाधीष्ठात्री जी शारदा देवता तिचे हे जग आहे. विधी निषेध आहे,बंध मोक्ष आहे, इत्यादी शब्दांनीच भ्रांती उत्पन्न केली आहे. जो जो शब्द जीव ऐकतो , त्या त्या शब्दाला परब्राम्हाहून निरनिराळ्या अर्थाची तो कल्पना करतो असा अर्थ.
वास्तविक पाहता श्रुती म्हणते विश्व हे केवल वाचारंभन म्हणजे शब्दमात्र आहे. म्हणजे नुसते शब्दच आहेत. शब्दांप्रमाणे अर्थ नाहीत. सर्व शब्दांचा अर्थ एक परमात्माच आहे. पण विचार न करणाऱ्या जीवाला या शब्दाने भ्रम उत्पन्न केला व निरनिराळ्या शब्दांचे अनेक अर्थ आहेत असे तो मानू लागला. म्हणून शब्दाधीष्ठात्री शारदेला 'विश्वमोहिनी' म्हटले आहे.

===श्री कृष्णार्पनमस्तु===
ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।

No comments:

Post a Comment