॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Saturday, July 7, 2012

हे तिन्ही एकवटले


हे तिन्ही एकवटले | तेथ शब्द्ब्रम्ह ते कवळले | ते मियां श्रीगुरुकृपा नमिले | आदिबीज ||१-२०||
अर्थ :
अकार, उकार, मकार ह्या तिन्ही मात्र ज्या ओंकारात एकरूप आहेत , त्या ओंकारात सर्व वैदिक शब्द्ब्रम्ह साठविले आहे . तो ओंकारच सर्व जगाचे 'आदिबीज' म्हणजे कारण असल्यामुळे श्रीगुरुकृपेने ते जाणून मी त्याला नमस्कार केला.||१-२०||

... विवरण :आदिबीज-
मनोवाग्गोचार असे परब्रम्ह जाणण्याकरता वेदाने परब्रम्हाचे ओम हे नाव ठेवले,ते अ, उ, म असे तीन मात्रात्मक आहे. जगदुत्पत्तीपूर्वी परब्रम्हाचे ठिकाणी ओंकाराचे स्फुरण होऊन , परमात्मा ओंकारवाच्य होतो. नंतर ओंकाराच्या अ, उ, म अशा तीन मात्र प्रकट होऊन त्यातून सर्व नामरूपे प्रकट होतात व त्या प्रकट झालेल्या नामरूपाचे योगाने परमात्मा जगतरुपाला येतो . ज्याप्रमाणे पोळपाट , लाटणे, खुर्ची वगैरे गोष्टी एका लाकूड या पदार्थाचे केवळ नामृपांचा बदल होऊनच होतात, त्याप्रमाणे परब्रम्ह हे प्रकट झालेल्या विविध नाम रुपांमुळे अज्ञानी लोकांना फलद्रूप भासते. या सर्व नाम रूपांचा विस्तार ओंकारात प्रथम साठविलेला असतो, म्हणून ओंकार जगाचे 'आदिबीज' म्हणजे मूळ कारण होय.
 
===श्री कृष्णार्पनमस्तु===
ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु

No comments:

Post a Comment