अर्थ: जेवढे काही वैदिक म्हणजे वेद व वेदानुकुल असलेले स्मृतीपुराने वगैरे वाड्मय आहे तेच या गणेश रुपी परमेश्वराची उत्तम रेखीव वेश केलेली मूर्ती असून त्या वाण्ग्मयातील शब्द हे गणेशाचे निर्दोष म्हणजे अव्यंग असे शरीर शोभत आहे.||१-३||
विवरण:
वर्णवपुनिर्दोष--येथे सर्व शब्दावर म्हणजे श्रुती -स्मृती , पुराने इत्यादी वैदिक वान्ग्मयावर गणेशाची मूर्तीची कल्पना करून त्या सर्वांची एकवाक्यता श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्वीकारली आहे. या वाण्ग्मयातील शब्द रचना निर्दोष म्हणजे पूर्ण भ्रमप्रमादादि दोष रहित आहे.१-भ्रम म्हणजे विपरीत ज्ञान होणे ; २- प्रमाद म्हणजे चुकणे ; ३- करणापाटव म्हणजे इंद्रियांचे असामर्थ्य ; ४- विप्रलिप्सा म्हणजे खोटे बोलून फसविण्याची बुद्धी. हे दोष जीवाच्या ग्रंथात असू शकतात, निस्वार्थी परमेश्वराच्या वांग्मययात राहत नाहीत, हा 'निर्दोष' या शब्दाचा आशय आहे.
श्री कृष्णार्पनमस्तु.......
No comments:
Post a Comment