स्मृति तेचि अवयव| देखा आंगीक भाव| तेथ लावण्याची ठेव| अर्थशोभा ||१-४||
अर्थ : निरनिराळ्या स्मृती ह्या गणेशाच्या शब्दरूपी शरीराचे स्वभावीक अंगभूत अवयव आहेत. त्या सर्व स्मृतीरूप अवयवांचे ठिकाणी त्या स्मृतीतील निरनिराळे सिद्धांतरूप अर्थसौंदर्य हेच गणेशाच्या शरीराचे एकवटलेले सौंदर्य होय. ||१-४||
विवरण : अवयव अंगिकभाव - श्रुती म्हणजे ज्याला आत्मविस्मृती कधीच झाली नाही अशा पुरुषाचे शब्द होत. असा एक परमात्माच आहे. म्हणून श्रुतीला , म्हणजे वेदाला परमेश्वरप्रणीत म्हणतात.या श्रुती म्हजे वेद, ब्राम्हण, उपनिषदे होत.
ज्यांना आत्मविस्मृती झाली त्यांना जीव म्हणतात. परमेश्वरप्रणीत श्रुतीवरून ज्यांना पुढे आत्मज्ञान झाले व नंतर त्यांनी जे ग्रंथ केले त्या ग्रंथांना स्मृती म्हणतात. मन्वादीस्मृती व षडदर्शने इत्यादी स्मृतिग्रंथ होत.
या सर्व श्रुती स्मृती पुराने वगैरेतील सर्व सिद्धांतांची एकवाक्यता आहे.ज्याप्रमाणे शरीराचे निरनिराळे अवयव शरीर पोषणाचे निरनिराळे कार्य करून एका संपूर्ण शरीराला पुष्टी देतात, त्याप्रमाणे स्मृती श्रुतीचेच अंगीक म्हणजे अंगभूत अवयव आहेत.म्हणजे श्रुतीतीलच अर्थ किंवा सिद्धांत त्यांनी व्यक्त केलेले आहेत म्हणून श्रुतीला पोषक आहेत.त्यात श्रुत्यर्थाला सोडून स्मृतीकाराने आपल्या बुद्धीतले काहीही सिद्धांत ओतले नाहीत असे 'अवयव' व 'अंगीकभाव' या पदांनी सुचविले आहे.
श्री कृष्णार्पनमस्तु...
Abhari aahe
ReplyDelete