अष्टादश पुराणें| तींचि मणिभूषणें| पदपद्धति खेवणें| प्रमेयरत्नांचीं ||१-५||
अर्थ:
अठरा पुराने हि गणेशाच्या वर्णरुपी शरीरावरील रत्नालंकार आहेत व त्यातील शब्दरचना हि त्यात असलेल्या अनेक वेदांतसिद्धांतरुपी रत्नांची कोंदणे आहेत.
विवरण:
'तिचीमणिभूषणे'- येथे अठरा पुराणांना गणेशाच्या शरीरावरील रत्नालंकार म्हटले आहे. याचा आशय असा आहे कि ज्याप्रमाणे अलंकाराने मनुष्याचे शरीर सुंदर दिसते, त्याप्रमाणे पुराणांनी वेदातील अर्थरुपी सिद्धांत शुशोभित करून दाखविले आहेत व पुराणातील शब्दरचनेने ते सिद्धांत रुपीअर्थ खुलउन ठसठशीत दिसतील असे मांडले आहेत. वेद हे अस्पष्टार्थबोधक असल्यामुळे त्यातील त्यातील सिद्धांत वेद शब्दावरूनच स्पष्टपने कळत नाहीत. परंतु तेच सिद्धांत स्पष्टपणे कळतील अशा शब्दात पुराणातून मांडले आहेत. म्हणूनच
इतिहास पुराणाभ्यां वेदं समुब्रुमःयेत | बिभेत्यल्प् श्रुतद्वेदो मामयं प्रहरिष्यति ||
इतिहास पुराणानुसार वेदाचा अर्थ करावा असे भारत, अविस्मृत्यादी ग्रंथातून सांगितले आहे व ऋग्वेदाच्या भूमिकेत विद्यारण्यांनी असेच म्हटले आहे. इतिहासे पुराने सोडून आपल्या बुद्धीने वेदांचा अर्थ करू पाहणारा माझा अर्थघात करील अशी वेदाला भीती वाटते.वेद श्रेष्ठ व इतिहास पुराने गौण असे मानल्यास गौण अशा इतिहास पुराणानुसार श्रेष्ठ अशा वेदाचा अर्थ करावा असे म्हणणे सयुक्तिक नाही.म्हणून वरील वाक्यावरून वेद व इतिहास पुराने यांचे तुल्य प्रामाण्य आहे असा अर्थ होतो.
वेद , स्मृती , पुराने , इतिहास इत्यादी ग्रंथ निरनिराळ्या काळी झाले असल्यामुळे त्यांची एकवाक्यता कशी करायची अशी कित्येक शंका घेतात, पण ती अज्ञान मूलक अतएव निरर्थक आहे. अज्ञानी जीवांना यथार्थ आत्मज्ञान व्हावे म्हणून नित्य ज्ञानी परमेश्वराने निर्माण केलेल्या वेद ग्रंथावर निरनिराळ्या काळी इतिहास पुराणादि ग्रंथ निर्माण झाले असले तरी ते भगवंतांनीच आपल्या ज्ञानसंपन्न अशा निरनिराळ्या अधिकारी पुरुषांकडून प्रगट करविले आहेत. अनि परमेश्वरापासून पूर्ण साक्षात्कारी होणार्या जीवापर्यंत जेवढे काही आत्मज्ञान प्रगट झालेले असते ते सर्वांचे एकरूपच असते. कारण त्या परब्रम्हाचा साक्षात्कार किंवा ज्ञान व्हावयाचे ते परब्रम्ह एकजिनसी, पूर्ण , निरंश असे असल्यामुळे ते ज्ञान प्रत्येक साक्षात्कारी पुरुषाचे भिन्न-भिन्न असू शकत नाही.ज्याप्रमाणे टीकाकार मुल ग्रंथकाराचा आशय स्पष्ट करतो, त्याप्रमाणे पुराण, इतिहास, वेद, संतवांग्मय यांची एकवाक्यता करून यथार्थ सिद्धांत कळू शकतो, असे सर्व साक्षात्कारी पुरुषांचे म्हणणे आहे व तशाच पद्धतीने त्यांनी वेदांत सिद्धांत ग्रहण केले आहेत.
श्री कृष्णार्पनमस्तु...
No comments:
Post a Comment