देखा काव्य नाटका| जे निर्धारितां सकौतुका| त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका| अर्थध्वनि||१-७||
अर्थ:जसा जसा विचार करावा तशी तशी जी काव्यनाटके कौतुकास्पद व चित्ताकर्षक वाटतात, तीच गणेशाच्या पायातील घागऱ्या असून त्यातील ध्वन्यार्थ हाच त्या घागर्यांचा रुणझुण नाद होय.||१-७||
विवरण:
अर्थध्वनी- येथे घागर्यांच्या ध्वनीप्रमाणे काव्य व नाटके हि वेदार्थाला गोड ध्वन्यार्थाने प्रगट करतात असे माउली सूचित करीत आहेत.म्हणनू वेदार्थानुकुल वेदार्थाची ध्वनी काढणारी काव्यनाटके येथे स्वीकारली पाहिजेत हे उघड आहे. धर्माविरुध्ह विषयवासना वाढवून इंद्रियाचे चाळे पुरविण्याची प्रवृत्ती उत्पन्न करणारी काव्यनाटके येथे घेता येणार नाहीत.
श्री कृष्णार्पनमस्तु.....
No comments:
Post a Comment