जेथ व्यासादिकांच्या मती | तेची मेखळा मिरवती | चोखाळपणे झळकती | पल्लवसडका ||१-९||
अर्थ : या वैदिकवाण्ग्मयातील व्यासादिक दर्शनकारांच्या विचारप्रांताची मर्यादा हाच गणेशाच्या कंबरेला बांधलेला शेला असून , त्यातील स्पष्टपणे झळकणारे विचार हेच शेलेल्यांचे मोकळेसडक पदर होत.||१-९||
विवरण:
...
व्यासादिकांची मती-शेल्यांचे झळकणारे पदर अनेक जरी असले तरी ते जसे एकाच शेल्याला शोभा आणतात, त्याप्रमाणे दर्शन्कारांचे विचार भिन्न असले तरी ते एकाच अद्वैतवेदांतमतालाच पोषक असतात असे येथे माउलींनी पुनः दर्शविले आहे.
श्री कृष्णार्पनमस्तु
No comments:
Post a Comment