॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Saturday, July 7, 2012

देखा षड्दर्शनें म्हणिपती



    देखा षड्दर्शनें म्हणिपती | तेची भुजांची आकृति | म्हणौनि विसंवादे धरिती | आयुधें हातीं ||१-१०||  
    अर्थ : वैदिक शादर्शने जी म्हटली जातात तीच निरनिराळ्या भुजांची आकृती होय. म्हणूनच निरनिराळी आयुधे हाती धरिली आहेत||१-१०||

विवरण:गणेशपुराणात कृतयुगातील गणेशाचे षड्भूजात्मक वर्णन केले आहे. तेच येथे षडदर्शनाच्या उपमेकरिता माउलींनी घेतले आहे. षड्दर्शने ही बाहू आहेत आणि व त्यातील प्रतिपाद्य विषय हि आयुधे होत. ए...क एक वैदिक दर्शन एका-एका भूजेच्या निरनिराळेपणासारखे निरनिराळे दिसते व भुजांचे निरनिराळेपणामुळे जसे निरनिराळ्या हातात निरनिराळी आयुधे धरता येतात,त्याप्रमाणे निरनिराळ्या दर्शनांचा प्रतिपाद्य विषयही निरनिराळा दिसतो. एका शरीराच्या निरनिराळ्या हातात जरी निरनिराळी आयुधे असली तरी ती सर्व शरीरसंरक्षणार्थच उपयोगीली जातात. त्याप्रमाणे सर्व वैदिक दर्शने निरनिराळा विषय प्रतिपादित असली, तरी ती वैदिक अद्वैतसिद्धान्ताचेच शेवटी पोषण करतात, किंवा तोच अर्थ सिध्द करतात असे दिसून येते.चहू वेदी जाण षडशास्त्री कारण | आठराही पुराणे हरीशी गाती || हरिपाठ.चार वेद, सहा शास्रे व अठरा पुराणे एका अद्वैत वस्तुचेच प्रतिपादन करितात असे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाचे अभंगात म्हटलेच आहे.
श्री कृष्णार्पनमस्तु

No comments:

Post a Comment