उपरी वेदोपनिषदे | जिये उदारे ज्ञानमकरंदे | तिये कुसुमे मुगुटी सुगंधे | शोभती भली ||१-१८||
अर्थ: ज्यात उदार ज्ञानरुपी मकरंद म्हणजे मध भरलेला आहे व जी वेदांचा अंतिम भाग म्हटली जातात ती उपनिषदे गणेशाच्या मस्तकाच्या मुकुटाचे ठिकाणी अत्यंत शोभणारी सुगंधी फुले आहेत .||१-१८||
विवरण :
वेदातील मंत्र व ब्राम्हण यातील कर्मकांडाच्या भागात , यज्ञयागादिक क्रिया ..., देवता इत्यादिक भिन्न भिन्न पदार्थाला धरून व अनेक निषेधाने युक्त असे संकुचित ज्ञान आहे . पण उपनिषदातून जे ज्ञान सांगितले गेले आहे , ते सर्व भेद नाहीसे करून, मुंगीपासून ब्राम्हदेवापर्यंत अखिल चारचार पदार्थांचे ठिकाणी एक पूर्ण ब्रम्ह सृष्टीच उत्पन्न करून देते. म्हणून उपनिषदातील ज्ञानाला 'उदार' म्हणजे पदार्थमात्राला एकसारखे समदृष्टीने पाहणारे ज्ञान असे म्हटले आहे. व ज्ञानाने सर्व दु:ख नाहीसे होऊन पुढे परमसुखाची प्राप्ती होते. म्हणून त्या ज्ञानाला सुगंधित फुलातील गोड मधाची उपमा दिली आहे .
=====श्रीकृष्णार्पनमस्तु=====
No comments:
Post a Comment