मग सहजे सत्कार वादु | तो पद्मकर वरदु | धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु ||१-१३||
अर्थ:
मग गणेशाचा पाचवा हात हा सहज असणारा सत्कार्यवादरुपी सांख्यदर्शन असून तेथे भक्तांना इच्छित वर देणारे करकमल आहे . आणि सहावा हात हा धर्म म्हणजे सच्चिदानंद धर्म, त्याची प्रतिष्ठा करून देणारे योगदर्शन असून त्यायोगे अभय प्राप्त होते, म्हणून त्या दर्शनाला माउली अभय असे म...्हणते .||१-१३||
विवरण:
सत्कारवाद:
"सत्कारवाद" म्हणजे सत्कार्यवाद .जगद्रूपी कार्य 'सत' म्हणजे खरे आहे,असा वाद. हा वाद सांख्यदर्शनाचा आहे. तो वाद सहज आहे . म्हणजे न सांगता सर्व अबाल वृद्ध, अज्ञानी जीव जगत खरे आहे असे स्वभावात:च मानतात.संख्या दर्शनात प्रकृती व पुरुष यांच्या विवेकाने म्हणजे प्रकृती व पुरुष हे दोन निराळे पदार्थ आहेत असे समजल्याने पुरुष , प्रकृती व तिच्या कार्यापासून आपल्याला अत्यंत अलग पाहतो व दु:खापासून सुटतो. म्हणून माउलीने सांख्यादार्शानाला वरदहस्त म्हटले आहे.
धर्मप्रतिष्ठा :
योगशाश्राने जीवाचे ठिकाणचे जीवधर्म जाऊन परमेश्वराचे सच्चिदानंदधर्म स्थापित होतात व तो 'अभय'ला प्राप्त होतो, म्हणून योगदर्शनाला 'अभयहस्त' असे म्हटले आहे.
=======श्रीकृष्णार्पनमस्तु====
No comments:
Post a Comment